आ.डाँ .सुधिर तांबे व आ.लहु कानडे यांच्या हस्ते स्मारकाच्या प्रलंबित कामाचा शुभारंभ

डाँ .आंबेडकर जयंती दिवशीच स्वाभिमानी स्मारकभूमीवरील कामकाज प्रारंभ
हरेगाव – महामानव डाँ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशीच नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ.डाँ .सुधिर तांबे व आ.लहु कानडे यांच्या हस्ते स्मारकाच्या प्रलंबित कामाचा शुभारंभ करण्यात आल्याने आंबेडकरवादी कार्यकत्यांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्मारकाच्या विकासकामांना शासकीय परवानगी मिळविण्याकरीता मदत केली .सदर कामाचे नव्याने टेंडर करुन कामाचा प्रारंभ करण्यात आला .कार्यक्रमाच्या सुरुवातीस डाँ .आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.डाँ .आंबेडकर जयंती निमित्ताने स्मारकावर आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली होती .तर जयंती च्या पूर्व संध्येला भिमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शांततामय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रभान पाटील थोरात , तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक , ज्ञानेश्वर मुरकुटे , अशोक बागुल , प्रताप देवरे आदी उपस्थित होते.
तसेच हरेगावचे सरपंच मंदाकिनी गाडेकर , उपसरपंच चेतन त्रिभूवन , उंदिरगावचे सरपंच सुभाष बोधक , आकाश सुर्यवंशी , सौरभ सुर्यवंशी , डाँ .नंदकुमार वाघमारे , समाधान वाहुळ , भारत गायकवाड , आकाश वाघमारे , रमेश भालेराव , अतुल भालेराव , सुहास धनेधर , सुनिल पवार , मयुर गडवे , गुलाब पठारे , सुनिल नरवडे अतुल बागुल , विलास दुशिंग , सुनिल शिनगारे , पुंजाहरी जाधव सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.