घोगरगाव येथे गावठाण शेती विज रोहित्र बसविण्याचा शुभारंभ

घोगरगाव येथे गावठाण शेती विज रोहित्र बसविण्याचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते व माजी कालवा निरिक्षक आबासाहेब पटारे व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थित नुकतेच संपन्र झाले
नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील शेतीच्या गावठाण विज रोहित्राची समस्या अनेक दिवसा पासून शेतकर्यांना भेडसावत होती म्हणून आबासाहेब पटारे यांनी गावकर्यांची अडचण लक्षात घेवून महावितरण अधिकारी वैभव निकम यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता निकम यांनी शेतकर्यांच्या समस्यांची दखल घेवून तात्काळ गावठाण शेती विज रोहित्र मंजुर करून कर्मचार्यांना आदेश देवून काम सुरू करण्यास सांगितले गावाचा विज प्रश्र मार्गी लागल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी अधिकारी वैभव निकम व आबासाहेब पटारे याचे आभार मानले.विज रोहित्र बसविण्यासाठी येथील काही शेतकरी यांनी विरोध दर्शविला होता मात्र प्रगतशील शेतकरी प्रभाकर शामराव पटारे यांनी विशेष मध्यस्थी करून जागा उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचेही आभार मानले
याप्रसंगी सरपंच सदाशिव बहिरट,दादासाहेब पटारे,देविदास बहिरट, सर्जेराव लोखंडे,मन्सुर पटेल, संभाजी पटारे,उपसरपंच ज्ञानदेव सिरसाठ,आप्पासाहेब पटारे,बालम शेख, मधुकर पटारे,निसार शेख, बशीर शेख,यांच्यासह महावितरणाचे कर्मचारी दिनकर चांडे,विलास वाल्हेकर,दिनकर होडगर,चंदू शिंदे,कैलास हाळनोर आदी उपस्थित होते