……. यांची मुंबईमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याची चर्चा होताना सागर बेग यांचं नाव प्रथम – चौधरी
श्रीरामपूर मतदारसंघाचा पुढील आमदार शिवसेनेचाच

……. यांची मुंबईमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याची चर्चा होताना सागर बेग यांचं नाव प्रथम – चौधरी
श्रीरामपूर मतदारसंघाचा पुढील आमदार शिवसेनेचाच
*श्रीरामपूर(प्रतिनिधी):- विधानसभा निवडणुकीत एकच उमेदवार दिला असता तर आज श्रीरामपूरचा आमदार हा भगव्याला व हिंदुत्वाला मानणारा शिवसेनेचाच असता अशी खंत व्यक्त करत पुढील आमदार हा मात्र शिवसेनेचाच असणार असा विश्वासही शिवसेना शिंदे गटाचे सचिव व उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केला आहे.*
श्रीराम रामनवमी निमित्ताने शहरातील थत्ते मैदानावर भरवण्यात आलेल्या खेळण्या पाळण्याच्या उद्घाटन प्रसंगी चौधरी बोलत होते.ते पुढे म्हणाले की,मुंबईत जेंव्हा जेव्हा अहिल्यानगरचा विषय निघतो तेंव्हा सागर बेग यांच्या नावाचा उल्लेख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रामुख्याने काढत असतात.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एकच उमेदवार न दिल्याने शिवसेनेची आमदारकी हुकली पण पुढे ही चूक न करता पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांची साथ शेवटपर्यंत देतात असे बोलून चौधरी यांनी सागर बेग यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे संपूर्ण राज्यभर बेग यांचे चालू असलेल्या धर्मकार्यास आता शिवसेनेची ताकद मिळाली असून त्यास बळकटी देण्याचे काम आपल्याला मिळून करायचे आहे असे चौधरी यांनी सांगून बेग यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
सागर बेग म्हणाले की, शहरातील श्रीरामनवमी निमित्त दरवर्षी भरणाऱ्या यात्रोत्सवात जिहादी लोकांना खेळण्या पाळण्याचे ठेके देण्याची गलिच्छ पद्धत सुरू झाली होती लावजिहादचे वाढत्या प्रकाराना अशा गर्दीच्या ठिकाणीच जिहादी मुसलमान खतपाणी घालत होते हिंदूंच्या अनेक मुली अशा गर्दीच्या ठिकाणीच लावजिहादच्या बळी ठरल्या आहेत हे प्रकार थांबवावेत म्हणून जास्त रक्कम मोजून हा ठेका आपण घेतल्याचे बेग यांनी सांगितले.याप्रसंगी बोलतांना भाजपाचे उत्तर नगर जिल्ह्याचे सचिव दत्ताभाऊ खेमनर यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने चुकीच्या उमेदवाराला ताकद दिल्याने काँग्रेसचा आमदार निवडून आल्याचा आपल्या मनातील रोष व सागर बेग यांच्यावर असलेली निष्ठा उघडपणे व्यक्त केली.
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सागर बेग यांनी केला तर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा सत्कार राष्ट्रीय श्रीराम संघाचे खंदे कार्यकर्ते अशोक रामा उर्फ बाबू साळवे यांनी केला याप्रसंगी नगरसेवक श्रीनिवास बिहानी,शिवसेना जिल्हाध्यक्ष औताडे यांच्यासह असंख्य शिव सैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर माळवे यांनी केले.