समाजाला धर्मोपदेश देता देता समाजाचे देणे लागतो

समाजाला धर्मोपदेश देता देता समाजाचे देणे लागतो या उदात्त हेतूने समाजातील वंचीत घटकाला मदतीचा हात म्हणून राहुरीचे स्नेहसदन चर्च गेल्या दोनवर्षापासून कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीत किराणा मालाचे किटस गरीब व गरजू कुटुंबांना वाटप करत आलेले आहे.
सध्याही कोरोनाचा संसर्ग अजूनही कमी झालेला नसताना तसेच लॉकडाऊनचे सावट दिसत असताना स्नेहसदन चर्चने दि. ११ जानेवारी रोजी गोरगरीब गरजू कूटुंबांना किराणा किटसचे वाटप करुन मानवता जपली आहे
राहुरी शहरातील स्नेहसदन चर्चच्या कँथॉलिक ख्रिस्ती कमिटी सदस्यांतर्फे गरीब आणि गरजू कुटुंबांन किराणा किट व ब्लँकेटचे वाटप प्रशासकीय अधिकारी यांचे उपस्थितीत प्रमुख धर्मगुरु फादर अनिल चक्रनारायण व सहाय्यक धर्मगुरु मायकल राजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या प्रसंगी नायब तहसिलदार दुशिंग साहेब,नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ.बांगर वन परिक्षेत्र अधिकारी गायकवाड,माजी नगराध्यक्ष संजय साळवे,संजय जाधव.डॉ.अविनाश जाधव,ग्रामसेविका माया फुलसौंदर,राजू ओहोळ,किरण पवार,रतन पाळंदे,नवीन साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी फादर अनिल चक्रनारायण यांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त करताना सांगितले की कबिरांचे ढाई अक्षर प्रेम घेवून,गौतम बुद्धांच्या शिकवणीतून करुणा प्रेम आणि मैत्र यांची जोडी सांभाळत पवित्र कुराणमधील अत्यंत दयाळू अल्लाहाची दया आणि ख्रिस्त येशूची शेजा-यावरील प्रीती घेवून आम्ही सर्व ठिकाणी संत शिरोमणी तुकोबांच्या रंजल्या गांजल्यात देवाची सेवा करण्यासाठी जमलो आहोत विविध धर्म आम्हाला करुणेचा दयेचा मानवतेचा संदेश देतात माणसा माणसा मधील प्रेम सहानूभूती कोरडी नसावी तर कृतीशिल असावी हाच संदेश आपला देश आजपर्यंत सर्व जगाला देत आला आहे हि आमच्या देशाची शान आहे,
येशू म्हणतो शेजा-याशिवाय स्वर्ग नाही,गरजू कोणीही असू तोच आपला शेजारी,गरजवंताला आणि गरीबाला जात धर्म वर्ण किंवा वंश नसतो तसाच मानवतेला,प्रेमाला करुणेला,किंवा मदतीला कोणताही धर्म किंवा जात नसते म्हणून हे सर्व भेद सांडून आम्ही एकत्र यायला हवे आणि जमेल तसे जमेल तेव्हा आणि शक्य होईल तेथे गरजूंच्या सहाय्याला धावून जायला हवे हेच येशू सांगतो. आपण सर्वांनी आपली कामे बाजूला ठेवून गरीबाच्या मदतीसाठी आमच्या विनंतीला मान देवून येथे आलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत काळजी घ्या,आपण सर्व या काळात आवश्यक सर्व नियमांचे पालन करुया असा संदेश दिला.
सायंकाळच्या वेळेस पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकारांना आमंत्रित करत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करुन पत्रकारांचे महत्त्व विषद करत यथोचित सन्मान केला या प्रसंगी जेष्ठ पत्रकार संपादक निसारभाई सय्यद,राजेंद्र वाडेकर,सुनिल भुजाडी पा.यांनी मनोगत व्यक्त करत स्नेह सदन चर्च व सदस्यांचे आभार व्यक्त केले प्रसंगी पत्रकार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
स्नेहसदन चर्च व ख्रिस्ती कमेटीने आयोजित केलेल्या किट वाटप कार्यक्रम व पत्रकार सन्मान सोहळा संपन्न होण्यासाठी गायक बबन साळवे,दादू साळवे,सचिन महिपती साळवे,दिपक रामजी साळवे,सुरज गुजर,अमित साळवे,रवी शिरसाठ,भाऊसाहेब मनतोडे,कुमार साळवे,किरण बाबुराव साळवे,अरुण पाळंदे,प्रकाश भोसले,आदींनी परिश्रम घेतले.
राहुरी तालुका
अशोक मंडलिक