धार्मिकमहाराष्ट्र
मकर संक्राती निमित्ताने विठ्ठल—रूख्मिणी मंदीरात महिलांची मोठी गर्दी.

मकर संक्राती निमित्ताने विठ्ठल—रूख्मिणी मंदीरात महिलांची मोठी गर्दी.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील विठ्ठल—रूख्मिणी मंदीरात मकर संक्राती सणाच्या निमित्ताने ओवसण्यासाठी सुवासीनींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
खास करून सवाष्ण महिलांचा सण म्हणून मकर संक्रातीच्या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. जानेवारी महिना सुरू होताच नवीन वर्षाची सुरूवात होते. याच नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रात. याच मकर संक्रातीचे औचित्य साधत रविवारी सुवासीनी महिलांनी नवीन साड्या व अलंकार परिधान करत हातात असणार्या ताटातील सुगड्यामध्ये (छोटे गाडगे) ओवसा घेवून विठ्ठल—रूख्मिणी मंदीरात मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी मंदीराच्या बाहेर दर्शनासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासनतास महिला वर्ग रांगेत उभा असतानाही चेहर्या आनंदोत्सव दिसून येत होता.