भेर्डापुरात बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न –

भेर्डापुरात बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न –
श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार भानुदासजी मुरकुटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सिद्धार्थ मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली व कामगार नेते गणेश छल्लारे यांच्या सहकार्याने आज दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी भेर्डापूर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगार व त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला अशी माहिती तपासणी अधिकारी सचिन पाटील व अशोकचे संचालक श्री प्रफुल्ल बाळासाहेब दांगट व पत्रकार दत्ता जानराव यांनी दिली.व सदर बांधकाम कामगारांना मोफत दवाखाने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाचे
तपासणी ते उपचार
आरोग्य योजना अंतर्गत
खालील ठिकाणी नोंदणी कृत बांधकाम कामगार व त्यांच्या पत्नी व दोन मुले ( १० वर्षा वरील) यांना निःशुल्क उपचार उपलब्ध आहेत.
१)श्री साई सेवा हॉस्पिटल शेवगाव रोड नेवासा फाटा
२)अहमदनगर ॲपेएक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मनमाड रोड, सावेडी
३)सिटी केअर हॉस्पिटल, तारकपुर एसटी स्टँड समोर अहमदनगर
४)युनायटेड सिटी हॉस्पिटल, कोठला बस स्टँड मागे, अहमदनगर
५) निरामय हॉस्पिटल, सुपा पारनेर
६)डॉक्टर मैड हॉस्पीटल, राहता एसटी स्टँड जवळ, राहता
७) श्री साईनाथ हॉस्पीटल, (डॉक्टर अमोल कर्पे)
एस बी आय बँक मागे,जाणता राजा मार्ग , नवीन नगर रोड, संगमनेर.
हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता जवळ असावी लागणारी आवश्यक कागद पत्र –
१)आधार कार्ड
२)महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाचे कार्ड किंवा (नुतनीकरणं पावती)
३) रेशन कार्ड झेरॉक्स प्रत
४) नुतनीकरणं केल्या नंतर किंवा बांधकाम कार्ड मिळाल्या नंतर मंडळाच्या नोंदणीकृत संस्थे मार्फत रक्त तपासणी झालेली असावी
सदर कामगार नेते गणेश भाऊ छल्लारे यांचे काम हे कामगारांच्या उदरनिर्वाहासाठी हिताचे असल्याचे असे कामगारांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.श्रीरामपूर तालुक्यातील बांधकामगारांच्या हितासाठी विविध योजना उपलब्ध करून दिल्यामुळे व उल्लेखनीय कामगिरीबद्दल ,गणेश भाऊ छल्लारे यांच्यावर सर्व सामान्य कामगारांचा आशिर्वांदाचा वर्षाव होत आहे.