बॅंक ऑफ इंडियाच्या वतीने दिव्यांगांच्या निवासी शाळेत पिठाची गिरणी भेट

बॅंक ऑफ इंडियाच्या वतीने दिव्यांगांच्या निवासी शाळेत पिठाची गिरणी भेट
बॅंक ऑफ इंडियाचा स्तुत्य अन सामाजिक उपक्रम
रेणुकामाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, संचलीत कै.भगवानराव ढोबळे मुकबधिर व मतिमंद निवासी विद्यालय, गेवराई येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बॅंक ऑफ इंडिया, शाखा गेवराई यांच्या वतीने बॅंकेच्या विशेष फंडातून ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत पिठाची गिरणी भेट देण्यात आली. सामाजिक उपक्रमाबद्दल बॅंकेचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
यावेळी बॅंक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक भागवतजी यादव, पा.ऑफिसर केतनजी शिंदे, कॅशियर उमेशजी वाघमारे, माजी स्वातंत्र्य सैनिक चत्रर्भुज सानप, सामाजिक कार्यकर्ते सावळेराम पौळ, शाळेचे मुख्याध्यापक माणिकराव रणबावळे, सोमनाथ ढोबळे, अशोक मोताळे, ज्ञानेश्वर मोताळे यांच्या सह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व दिव्यांग शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी संस्थेच्या तसेच शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.