गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात येवु नये मांडवे ग्रामस्थांचे तहसीलदारांना साकडे

गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात येवु नये मांडवे ग्रामस्थांचे तहसीलदारांना साकडे
गायरान जमीनीवरील अतिक्रमण न काढता ते कायम स्वरुपी करण्यात यावे अशी मागणी मांडवे तालुका श्रीरामपुर येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार श्रीरामपुर यांच्याकडे केली आहे न्यायालयाच्या निर्देशानुसार गायरान जमीनीवरील अतिक्रमण तातडीने काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असुन श्रीरामपुर तालुक्यातील मांडवे येथील एकुण ९१ कुटुंबाला या बाबत नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत मांडवे येथील गट नंबर१८० मधील गायरान जमिनीवर अतिक्रमण करुन गेल्या अनेक वर्षापासून ९० ते १०० कुटुंब वास्तव्यास आहेत त्यांनी वेळोवेळी नियमानुसार घरपट्टी पाणी पट्टी विज बिल भरलेले आहे त्यामुळे त्यांचे अतिक्रमण कायमस्वरुपी करण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्याकरी सरपंच निखील वडीतके उपसरपंच गोवींद ताबे मंडळाचे नेते आण्णासाहेब गेठे सदस्य शहाजी वडीतके गोकुळ पवार साहेबराव चितळकर संतोष चितळकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांनी निवेदन स्विकारले या वेळी बोलताना आण्णासाहेब गेठे म्हणाले की मांडवे येथील गायरान जमीनीवर गेल्या अनेक वर्षापासून शंभर कुटुंब राहत असुन त्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत त्यांची अतिक्रमण कायमस्वरुपी करुन देण्यात यावी या करीता शासन दरबारी अनेक वेळा निवेदने दिली ग्रामसभेचे ठरावही दिले तसेच महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा .यांच्याशी देखील चर्चा करण्यात आलेली आहे तरी देखील येथील नागरीकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत आता लवकरच विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे सर्व नागरीकांची रास्त मागणी आहे तरी शासनाने कुणालाही बेघर करु नये असे गेठे म्हणाले आम्हाला कुणालाही बेघर न करता आमच्या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील मा .जिल्हाधिकारी मा उपविभागीय अधिकारी आदिंना पाठविण्यात आलेल्या आहेत या निवेदनावर मायकल साळवी साहेबराव चितळकर गोकुळ पवार विठ्ठल अनारसे सुनिल तुपे नामदेव रजपुत बाबासाहेब अनारसे नामदेव अनारसे एकनाथ पोकळे कचरु गांगुर्डे मंदा भुजबळ बाळासाहेब पोकळे बाळू पवार भिवसेन मोरे छबु बर्डे मल्हारी माळी संतोष माळी सुरेश मोरे मंगल मोरे सुभाष गांगुर्डे सोमनाथ पवार किरण गायकवाड उषा पवार विष्णू सोनवणे बेबी संसारे माया माळी दत्तू माळी आदिसह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत