विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळून गावाचा लौकिक वाढवावा… राजेंद्र कोकणे यांचे प्रतिपादन
विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळून गावाचा लौकिक वाढवावा… राजेंद्र कोकणे यांचे प्रतिपादन
टाकळीभान: विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊन यश मिळवावे व गावाचा लौकिक वाढवावा .विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये सातत्य व निरंतर प्रयत्न केल्यास त्यांना यश हमखास मिळेल असे प्रतिपादन राजेंद्र कोकणे यांनी केले. व्हिज्युअल अकॅडमी अभ्यासिका केंद्राच्या वतीने नुकतेच पुणे पोलीस S.R.P.F. परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केलेल्या राहुल कारभारी जाधव याच्या सत्कार प्रसंगी कोकणे बोलत होते. त्यांनी टाकळीभान सारख्या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका केंद्र सुरू केल्याबद्दल संचालक महेश शिंदे सर प्रशांत जाधव सर यांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे या अभ्यासिका केंद्राचे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश मिळून विविध पदावर विराजमान होत आहेत याचा ग्रामस्थांना अभिमान असल्याचे सांगितले. तसेच आरटीओ अधिकारी असलेले टाकळीभान येथील भूमिपुत्र सुयोग माने यांनी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करून आपल्या अनुभवाची ही उदाहरणे दिली. यावेळी यश संपादन केलेले राहुल जाधव यांचे पालक वडील वृत्तपत्र विक्रेते कारभारी जाधव या दोघांचाही ग्रामस्थांच्या व आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश शिंदे सर यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी डॉ. मोरे, श्रीधर गाडे, गजानन कोकणे, बाबासाहेब तनपुरे, बंडोपंत बोडखे, भैया पठाण बाबासाहेब बनकर आंबेडकर आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन राऊत यांनी केले.